Wednesday, April 24, 2024
Homeधुळेकंटेनरसह ट्रकमधील 97 गुरांची सुटका

कंटेनरसह ट्रकमधील 97 गुरांची सुटका

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

कंटेनरसह ट्रकमधून निदर्यपणे वाहतूक होणार्‍या तब्बल 97 गुरांची शिरपूर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. हाडाखेड चेकपोस्टवर

- Advertisement -

दोन्ही वाहनांना पकडण्यात आले. वाहनांसह 30 लाख 45 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या सपोनि अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पहाटे पाच वाजेच्या सुमारास कंटेनरला (क्र. युपी 21 एएन 2985) थांबविण्याचा इशारा केला.

तेव्हा चालकाने गाडी बाजुला उभी पसार झाला. तसेच त्या मागून येणार्‍या दुसर्‍या ट्रकवरील (क्र. एमपी 09 एचजी 6059) चालकाला देखील थांबण्याचा इशारा केला असता त्याने वाहन उभे केले.

कंटेनरच्या कॅबीनमध्ये बसलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने मुक्तीहार नबीनुर मुलतानी (वय.40 रा. बोतलगंज ता. मल्लारगड, मंदसोर, मध्यप्रदेश) असे स्वतःचे नाव सांगितले.

तर पळून गेलेल्या चालकाचे नाव विचारता त्याचे अकबर मुलतानी (रा. मुलतानपुरा जि. मंदसोर, मध्यप्रदेश) असे सांगितले. कंटनेरची तपासणी केली असता दोन पार्टीशनमध्ये तब्बल 50 गोर्‍हांना दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबुन निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले.

तसेच ट्रकची तपासणी केली असता त्यातही दोन पार्टीशनमध्ये 12 गायी व 35 गोर्‍हांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत कंटेनरमधील 2 लाख 50 हजार रूपये किंमतीचे एकूण 50 गोर्‍हे, 15 लाखांचा कंटेनर तसेच ट्रकमधील 2 लाख 95 हजार रूपये किंमतीचे 12 गायी व 35 गोर्‍हे व 10 लाखाचा ट्रक असा एकुण 30 लाख 45 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोकाँ राजीव गिते यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सपोनि अभिषेक पाटील यांच्यासह पोहेको संजय नगराळे, शामसिंग वळवी, पोना. संजीव जाधव व राजेश्वर कुंवर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या