Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभाजी विकण्यासाठी गेला, नंतर बाजार समिती आवारात आढळला मृतदेह

भाजी विकण्यासाठी गेला, नंतर बाजार समिती आवारात आढळला मृतदेह

देवळा । Deola

सोमवारी देवळा कृषी उत्पन्न बाजार (Deola Krushi Bajar Samiti) समिती आवारात फ्लॉवर विक्रीसाठी (Vegetable Market) आलेल्या बावीस वर्षीय युवा शेतकऱ्याचा बाजार समिती समोरील निर्मल बालरुग्णायाजवळ (Nirmal Balrugnaly) रात्री १० वाजेच्या सुमारास संशयास्पद मृतदेह (Suspicious Death) आढळून आला असून त्याचा खून झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी देवळा पाच कंदिल परिसरात (Deoal Pach Kandil area) रास्ता रोको आंदोलनाचा (Rasta Roko agitation) प्रयत्न वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर अखेर पोलिसांनी लाठीमार केला.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की खुंटेवाडी(Khuntevadi) येथील दिपक अशोक ढेपले ( २२ ) हा युवा शेतकरी सोमवारी ( दि.१२ ) आपल्या शेतातील फ्लॉवर विक्रीसाठी पिकअप गाडीने (Flower vegetable) देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास बाजार समिती समोरील निर्मल बालरुग्णालयाजवळ त्याचा मृतदेह आढळुन आला.

त्याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करून त्याचा खून (Murder Case) केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी देवळा पोलिस स्पाथानकासमोर मोठी गर्दी केली. व जोपर्यंत याच्यातील सत्यता काय आहे ते समजत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक (Nashik) येथे पाठवण्यात आला होता. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह आल्यानंतर नातेवाईकांनी तो ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्यांवर लाठीमार केला. त्यानंतर रात्री उशीरा काही नातेवाईकांसोबत पोलिस बंदोबस्तात (Police Bandobast) मृतदेह खुंटेवाडी येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधीक तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक शर्मिला वालावरकर. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक महेश निकम, निलेश सावरकर, सचिन भामरे आदी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या