Thursday, April 25, 2024
Homeनगरबोठेला मदत करणार्‍या अनंतलक्ष्मीचा जामीन फेटाळला

बोठेला मदत करणार्‍या अनंतलक्ष्मीचा जामीन फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी) – रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे (Bal Bothe) याला फरार काळात मदत करणारी महिला पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (P. Anantalakshmi Venkatam Subbachari) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचा मुख्य सूत्रधार बोठे हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपी बोठे फरार झाला होता. आरोपी बोठे फरार असताना तो हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात लपला होता. बोठेला तब्बल 102 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

आरोपी बोठेला फरार काळात मदत करणार्‍या चार जणांना देखील पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यातील आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला फरार होती. तिने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर काल सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. युक्तिवादाच्यावेळी फिर्यादी यांच्यावतीने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी बाजू मांडली तर त्यांना अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी मदत केली. आरोपी सुब्बाचारी हिच्यावतीने अ‍ॅड. पवार यांनी बाजू मांडली.

आरोपी सुब्बाचारी हिच्यावतीने मी बोठे याला ओळखत नसून स्वत: वकील असून गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा बचाव करण्यात आला. तर फिर्यादी यांच्यावतीने जर आरोपी सुब्बाचारी बोठेला ओळखत नव्हती, तर त्या बोठेच्या संपर्कात कशा होत्या. बोठेचा नंबर त्यांच्याकडे कसा आला असा युक्तीवाद करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या