Thursday, April 25, 2024
Homeजळगावसामाजिक बांधिलकीतून 50 वर्षीय मनोरुग्णाचे पुनर्वसन

सामाजिक बांधिलकीतून 50 वर्षीय मनोरुग्णाचे पुनर्वसन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे (Demokratir Sakharam Joshi Foundation) स्वातंत्र्य चौकातील एका 50 वर्षीय अत्यंत कृश, अशक्त मनोरुग्न पुरूषाच्या पुनर्वसनाची (Rehabilitation of mentally ill man) जबाबदारी स्वीकारण्यात आली. काही कायदेविषयक सोपस्कार, बाबींची पूर्तता करून त्या मनोरुग्णाची रवानगी चोपडा येथील मानव सेवा संस्थान (Institute of Human Services) येथे पुढील उपचारासाठी (treatment) करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांना ती व्यक्ती विपन्नावस्थेत दिसली. त्यांनी त्या व्यक्तीची चौकशी केली, त्याची अवस्था बघून त्यांच्या मनात दया निर्माण झाली. अनेक दिवसांपासून आंघोळ देखील त्याने केलेली नव्हती. ती व्यक्ती एका झुडपात आश्रयाला होती. कोठून आली, तिचे नाव काय, याबाबतची स्वत:ची माहिती देखील देऊ शकत नव्हती.

त्यांना त्यांची माहिती विचारण्याचा प्रयत्न ही केला परंतु ती व्यक्ति अत्यंत अशक्तपणा असल्याने बोलू शकत नव्हती. अत्यंत दयनीय अवस्था पाहून त्या व्यक्तीची पुनर्वसनाची जबाबदारी लोकशाहीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी घेण्याचे ठऱविले. या व्यक्तीच्या उपचारासाठी ज्या आवश्यक कायदेशीर बाबी असतात त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे.

रस्त्यावर विषण्ण मनस्थितीत असलेल्या मनोरुग्णांचे पुनर्वसन या उदात्त हेतूने लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान या दुर्लक्षीत असलेल्या सामाजिक प्रश्नावर काम करीत आहे. रस्त्याच्या कडेला बसून आपले जीवन व्यतीत करणार्‍यांचे पुनर्वसन आपण करायला हवे या उदात्त दृष्टीने लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे पुढाकार घेऊन त्या मनोरुग्ण व्यक्तीची जबाबदारी घेतली जाते. संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोशी, संस्थेचे सचिव संदीप जोशी, जगदीश नेवे, विजय जोशी, निखिल बोरसे , वैजनाथ पाटे, निषाद पांढरे , अजय काथार, अनिल जोशी आदींचे सहकार्य लाभले.

आतापर्यंत चार मनोरुग्णांवर उपचार

गेल्या सहा वर्षांपासून रस्त्यावर फिरणार्‍या मनोरुग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी निरपेक्ष भावनेतून लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था कार्य करीत आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 3 एप्रिल 2021 ला सिव्हील हॉस्पीटलच्या आवारात राहणार्‍या मनोरुग्ण महिलेची, त्यानंतर एका मनोरुग्ण ची जबाबदारी लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानने घेतलेली आहे. आधीचे तिघे व आता या नव्याने जबाबदारी स्विकार केलेल्या चौथ्या मनोरुग्णावर चोपडा येथील मानव सेवा संस्थेत उपचार सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या