Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस केंद्राची मंजुरी - आ. विखे

प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस केंद्राची मंजुरी – आ. विखे

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक (Kolhar Budruk) आणि भगवतीपूरच्या (Bhagawati) सुमारे 58 कोटी 42 लाख रुपयांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस (Regional Pipeline Supply Scheme) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन (Central Government Aquatic Mission) अंतर्गत मंजूरी मिळाली असल्याची माहीती माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

- Advertisement -

कोल्हार बुद्रुक (Kolhar Budruk) आणि भगवतीपूर (Bhagwati) गावाअंतर्गत येणार्‍या वाड्या वस्त्यांवरील नागरीकांना पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने पाणी पुरवठा योजनेचा (water supply scheme) प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे (Maharashtra Life Authority Department) सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने सदर पाणी पुरवठा योजनेच्या (Water supply scheme) प्रस्तावाला राज्य समितीने मान्यता मिळाल्याने पुढील मंजूरीसाठी जीवन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे पाठवला होता. याबाबतच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पाणी पुरवठा योजनेस मंजूरी मिळाली असल्याचे आ.विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.

या योजनेच्या साठवण तलावासाठी श्री.भगवती माता देवस्थान ट्रस्टने ट्रस्टची जमीन विमामुल्य उपलब्ध करुन दिलेली असल्याने ट्रस्टच्या सहकार्याने कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी स्षष्ट केले.

या योजनेच्या कामास आता 58 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या योजनेच्या कामाला प्रारंभ होईल असा विश्वास आ.विखे पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 58 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. भास्कराव खर्डे, कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, सौ.संगिताखर्डे, दत्तात्रयखर्डे, धनंजय दळे, अशोक असावा, भाऊसाहेब खर्डे पाटील, सरपंच सौ.निवेदिता बोरुडे, उपसरपंच सौ.संगिता खर्डे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, भरत अंत्रे, अ‍ॅड.उदय खर्डे, संभाजी देवकर यांच्यासह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आ.विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या