Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याअवाजवी बिलापोटी घेतलेली रक्कम परत

अवाजवी बिलापोटी घेतलेली रक्कम परत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून अवाजवी बिले वसूल करण्याचा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या ऑडीटरमार्फत सुरू असलेल्या बिले तपासणीत अडीच महिन्यांत जादा बिलापोटी घेतलेले 2.89 कोटी रुपये रुग्णांना परत केले आहे. या बिल तपासणीतून करोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणुकीचा गंभीर प्रकार मंहापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पुराव्यासह उघडकीस आणला होता.

त्यानंतर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यांची गंभीर दखल घेत तत्काळ प्रत्येक खासगी रुग्णालयात दर आकारणी फलक लावण्याचे आदेश दिल्यानंतर याठिकाणी महापालिकेने खासगी रुग्णालयात 112 ऑडीटर नियुक्त केले होते.

त्यानंतर मनसेना नगरसेवक सलीम शेख व विद्यमान स्थायी सभापती गणेश गिते यांनी अवाजवी बिलांसदंर्भातील प्रकार समोर आणला होता.

गेल्या अडीच महिन्यांत ऑडीटर यांनी दररोज सरासरी 80 बिले तपासण्याचे काम केले. आत्तापर्यंत 9 हजार 880 करोना रुग्णांची बिले तपासण्यात येत आहे. आत्तापर्यंतच्या तपासणीस जादा लावलेली एकूण 2 कोटी 89 लाख 22 हजार 250 रुपयांची (दि.21 ऑक्टाबर 2020 पर्यंत) रक्कम कमी करत रुग्णांना परत केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या