Tuesday, April 23, 2024
Homeनगररेडी नदीवरील पूल गेला वाहून, दळणवळणाचा प्रश्न गंभीर

रेडी नदीवरील पूल गेला वाहून, दळणवळणाचा प्रश्न गंभीर

बक्तरपूर |वार्ताहर| Bakatarpur

शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील रेडी नदीवरील पूल गेल्या पंधरा दिवसांपासून सतत होत

- Advertisement -

असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला. त्यामुळे गावकर्‍यांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शेवगाव – नेवासा राज्य मार्गावरील भातकुडगाव फाटा-बक्तरपूर रस्त्यावर रेडी नदी आहे. गेल्या पंधरा- वीस वर्षांपूर्वी या नदीवर पूल बांधण्यात आला.निकृष्ट बांधकाम होत असल्याने पत्रकार बाळासाहेब जाधव, शेषराव सामृत, भाऊसाहेब सामृत, मारुती सामृत यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देऊन निकृष्ट होत असलेले बांधकाम बंद पाडले होते.

ठेकेदाराशी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांचे साटेलोटे असल्याने चांगले बांधकाम करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा बांधकामाला सुरुवात करण्यात आली.बांधकामात कुठलीही सुधारणा होत नसल्याने पुन्हा तक्रार करण्यात आली.

या तक्रारीकडे संबंधित खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट कामाला प्रोत्साहन दिले. काम बंद पाडल्यास हा निधी दुसरीकडे वर्ग करू अशी धमकीवजा सूचना संबंधित अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना दिल्याने नाइलाजाने निकृष्ट काम ग्रामस्थांना होवू द्यावे लागले.

वेळीच अधिकार्‍यांनी दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटत आहेत. हा पूल वाहून जवळजवळ आठ दिवस झाले तरी लोकप्रतिनिधींसह, जि.प.अध्यक्षा, पं.स. सभापती,राजकीय नेत्यांचे, पुढार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.या पुलाचे तातडीने आपत्ती व्यवस्थापन निधीतून काम करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

बक्तरपूर ग्रामस्थांना कुठेही जायचे असेल तर फक्त अर्ध्या की.मी.अंतरावर असलेल्या भातकुडगाव फाट्यावर यावे लागते. अतिवृष्टीच्या पुरामुळे रेडी नदीवरील पूल वाहून गेला असल्याने पायी सुध्दा जाता येत नाही.भातकुडगाव फाट्यावर जाण्यासाठी देवटाकळी मार्गे सहा की.मी.लांब अंतरावरून प्रवास करावा लागत आहे.तातडीने या रस्त्याचे काम करून वाहतुकीस खुला न केल्यास ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करू.

– मारुती सामृत, भाऊसाहेब सामृत

- Advertisment -

ताज्या बातम्या