Saturday, April 27, 2024
Homeनगरचार कोटींच्या रक्तचंदन साठ्याप्रकरणी तिघे ताब्यात

चार कोटींच्या रक्तचंदन साठ्याप्रकरणी तिघे ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुमारे चार कोटी रुपयांच्या रक्तचंदन साठा प्रकरणात आणखी तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विठ्ठल बबन झावरे (वय 34 रा. वासुंदे, ता. पारनेर), संतोष साहेबराव माने (वय 35 रा. सावरगाव फाटा, ता. पारनेर) व सागर गोविंद मुळे (वय 38 रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात जागा मालक सदाशिव सिताराम झावरे (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. तर लक्ष्मण गणपत शिर्के (कर्जुले हर्या ता. पारनेर) हा अद्यापही पसार आहे.

- Advertisement -

एमआयडीसी परिसरात एका गोदामात साठवलेले साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील गोदाम मालकाला पोलिसांनी कारवाईवेळीच अटक केली. गुन्ह्यातील पसार असलेल्या तिघांना बुधवारी पहाटेच्या दरम्यान मुंबई येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी दिली.

एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने तिघांना पनवेल येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यातील लक्ष्मण शिर्के हा पसार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या