Rain Update : कोकणात रेड अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज, नाशिकचं काय?

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

यंदाचा मान्सून बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biparjoy) लांबला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस राज्यात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनने (Monsoon) संपूर्ण देश व्यापला. काही वेळ विश्रांती नंतर पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला आहे. आज कोकणात पावसाचा रेड तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नको हा दुरावा…!

पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. गेली चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली.

कोणता झेंडा घेऊ हाती?

हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आज राज्यातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हा तर मतदारांचा, लोकशाहीचा अपमान

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *