Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनोकरभरती घोटाळा; कंपनीसह अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

नोकरभरती घोटाळा; कंपनीसह अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

.आदिवासी विकास महामंडळ Tribal Development Corporation आणि शबरी वित्त महामंडळामध्ये Shabari Finance Corporation 389 पदासाठी झालेल्या नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी Recruitment scam दोषी कंपनी कुणाल आयटीसह महामंडळातील दोन मोठ्या अधिकार्‍यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

तब्बल पाच वर्षानंतर हे गुन्हे दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेत साडेतीनशे कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार भाजपचे दिंडोरीचे तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

महामडंळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे,चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोंखडे आणि कुणाल आयटीचे संचालक संतोष कोल्हेंवर भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे. महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक बाजीराव जाधव आणि या भरती प्रक्रियेत संशय असलेला राष्ट्रवादीचा पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल न झाल्याने या कारवाई प्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे.

आदिवासी विभागा अंतर्गत येणार्‍या राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळासाठी सन 2016 मध्ये 584 पदांची भरतीप्रक्रिया वादात सापडली होती. विभागाने शासनमान्य तांत्रिक संस्था सोडून खाजगी संस्थेकडून पहिल्या टप्प्यात 389 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तब्बल 36 हजार उमेदवारांनी अर्ज केले असले तरी,विभागातील जाधव,मांदळे आणि कुणाल आयटी कंपनीने संगनमत आणि आर्थिक गैरव्यवहार करत सोयीच्या उमेदवारांची भरती केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार डवले यांनी चौकशी करून भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला होता.त्यानुसार मांदळेसह दोन अधिकार्‍यांना निलंबितही करण्यात आले होते.तर आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी ही नोकरभरती प्रक्रियाच रद्द केली होती.परंतु,या प्रकरणात पुढे संबधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, अशोक उईकेसह विद्यमान मंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी देखील टाळाटाळ केली होती.

त्यामुळे माजी खासदार चव्हाण यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला होता.अखेरीस महामंडळात नव्याने आलेले कार्यकारी संचालक दिपक शिंगला यांनी संबधितावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई पुर्ण केली आहे. या कारवाईमुळे विभागात खळबळ उडाली असून नोकरभरतीपासून वंचित ठेवलेल्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.

नोकरभरती प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बाजीराव जाधव यांच्यावर कारवाई संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात असून त्याची मंजूरी मिळताच त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल.

दीपक शिंगला, एमडी, आदिवासी विकास महामंडळ

Deepak Shingla, MD, Tribal Development Corporation

- Advertisment -

ताज्या बातम्या