Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेच्या थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई गतिमान

जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई गतिमान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई गतिमान करावी,असे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत .

- Advertisement -

जिल्हा बँकेचा सन २०२०-२०२१ कर्ज वसुली हंगाम सुरू असल्याने चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व्हावी व बँकेच्या खातेदारांना रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी यांची वसुलीबाबत आढावा बैठक घेऊन वरील सूचना केल्या.

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०७ नुसार कारवाई करून अपसेट प्राईज (मुल्यांकन ) प्रकरणे तयार करावेत. थकबाकीदार सभासदांच्या मालमत्तेचे लिलाव करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करावी,असे आदेश आहेर यांनी बैठकीत दिले .

१५२४ थकबाकीदार

त्याअनुषंगाने बँकेच्या केंद्र कार्यालयातील अधिकारी , सेवकांना तालुकास्तरावर पाठवून लिलाव प्रक्रिया राबिण्यास व शिल्लक थकबाकीदारांचे अपसेट प्राईज (मुल्यांकन ) प्रकरणे तयार करून थकीत वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे एकूण १५२४ थकबाकीदार सभासदांच्या मालमत्तेचे अपसेट प्राईज (मुल्यांकन ) प्रकरणे संबधीत उपनिबंधक,सहाय्यक तालुका निबधक कार्यालयाकडे सादर केलेले आहेत.

अपसेट प्राईज (मुल्यांकन ) प्राप्त झाल्यानंतर लिलाव लवकरच करण्यात येणार आहेत. जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या