Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिलासादायक : जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी ११६० ​रुग्ण करोनामुक्त

दिलासादायक : जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी ११६० ​रुग्ण करोनामुक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १५४९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ११६० रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १५४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात ११८४, नाशिक ग्रामीण विभागात २६७, मालेगाव मनपा विभागात ४० तर, जिल्हाबाह्य ५८ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एका करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. यात नाशिक ग्रामीण विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे .आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७६६ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या