Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआरोग्य विद्यापीठाचा उद्या सामंजस्य करार

आरोग्य विद्यापीठाचा उद्या सामंजस्य करार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन व नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमास वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे उपमुख्यमंत्री रॉजर कुक, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटेऋ डेम ऑस्ट्रेलियाच्या मा. प्रति-कुलगुरू प्राध्यापिका सेलमा अलिक्स, कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन करण्यात येणार असून या आरोग्य कोशात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या आरोग्य कोशात सुमारे 550 पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून विद्याशाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्यकोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरत उपयुक्त असणार आहे.

तसेच या कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (University of Health Sciences)आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रेडेम ऑस्ट्रेलिया (University of Notre Dame Australia )यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारांतर्गत शिक्षणाकरता आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मूल्यानुसार संबंधित विषयांमधील तज्ज्ञांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थी आणि कर्मचारी गतिशीलतेसाठी संधी वाढवणे, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य मजबूत करणे, विद्यापीठ संसाधने आणि सुविधांच्या परस्पर विनिमयासाठी प्रक्रिया सुरू करणे, उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधनसंदर्भात जागरुकता वाढवणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या