Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपुरात आणखी 4 कोविड सेंटरला मान्यता

श्रीरामपुरात आणखी 4 कोविड सेंटरला मान्यता

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर तालुक्यात करोनाचा वाढता संसर्ग पहाता तालुक्यातील कोविड सेंटरमधील बेडची संख्या अपूर्ण पडू लागल्याने

- Advertisement -

तालुक्यात आणखी 4 कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. यातील चार पैकी तीन कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या चार कोविड सेंटरमुळे 100 ते 150 बेडची अधिक उपलब्धता होणार आहे.

या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, आदिवासी मुलांचे वसतीगृह, आदिवासी मुलींचे वसतीगृह, तसेच ग्रामीण रुग्णालयय हे शासकीय कोविड सेंटर उपलब्ध आहेत. यात 545 बेड असून यातील केवळ 345 बेडचा सध्या वापर सुरु आहे. याशिवाय संजीवन हॉस्पिटल, साई कोविड सेंटर साईशितल कोविड सेंटर, अल्फा हॉस्पिटल, मोरगे हॉस्पिटल, विद्यानंद कोविड सेंटर हे सेंटर सुरु होते. आता नवीन साईश्रद्धा कोविड सेंटर, श्री कोविड सेंटर, विघ्नहर्ता कोविड सेंटर, साईआधार कोविड सेंटर हे चार नवीन कोविड सेंटरला मान्यता मिळाली आहे. आदी कोविड सेंटरमध्रे उपलब्ध असणार्‍रा बेडपैकी 80 टक्के बेड फुल्ल झाल्रा आहेत. राशिवार ग्रामीण रुग्णालरातील 50 बेडपैकी 43 बेड फुल आहेत. तर डॉ. आंबेडकर वसतीगृहात असणार्‍रा 200 बेडपैकी 178 बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. आज घडीला सरकारी आणि खाजगी कोविड सेंटरमध्रे एकूण 577 बेड असून त्रापैकी 475 म्हणजे तब्बल 80 टके बेड रा फुल आहेत तर 20 टक्के म्हणजे 139 बेड खाली आहेत. रात साई कॉबिड सेंटर, साईशितल कोविड सेंटर, अल्फा हॉस्पिटल, मोरगे हॉस्पिटल, विद्यानंतर कोविड सेंटर रेथे एकही जागा शिल्लक नाही, अशी माहिती ग्रामीण रुग्णालराच्रावतीने देण्रात आली.

चार नवीन कोविड सेंटरला परवानगी मिळाल्याने आता श्रीरामपुरात सुमारे 950 बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे 100 ते 15 नवीन बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांची जास्त परवड होणार नाही. सध्या ऑक्सीजनचा तुटवडा असल्यामुळे नवीन कोविड सेंटरला परवानगी देतांना त्याचा अगोदर विचार करावा लागत आहे. ऑक्सीजनचा पुरवठा सुरु झाल्यास आंबेडकर वसतीगूहातील सर्वच्या सर्व बेडचाही वापर करता येवू शकेल. तसेच स्टॉपही कमी असून तो पुरविल्यास कोविड रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा देता येवू शकेल, असे डॉ. योगेश बंड यांनी सांगितले.

तालुक्यात केवळ 48 रेमडेसीवीर उपलब्ध

ग्रामीण रुग्णालरात उपचार घेत असलेल्रा रुग्णांसाठी 6 दिवसांपूर्वीच काही रेमडेसीवीर इंजेक्शन आले होते. दोन दिवसापूर्वीही रेमडेसिवीरचे इंजेक्शन आले. ते रुग्णांसाठी वापरण्रात रेत आहेत. खाजगी कोविड सेंटरमध्रेही मागणीप्रमाणे रेमडेसिवीर रेत आहेत परंतु या इंजेक्शनचा तुटवडा असल्राने आलेल्रा इंजेक्शनचा प्रमाणात पुरवठा केला जात आहे. काल श्रीरामपुरात केवळ 48 रेमडेसिवीर इंजेक्शन आले. पैकी रुनिटी हॉस्पिटलला 6, संजीवनला 12, अल्फाला 12, साईशितलला 12, विद्यानंदला 6 इंजेक्शन देण्रात आल्राचे प्रांताधिकारी अनिल पवार रांनी सांगितले. मागणी जादा आहे परंतु पुरवठा कमी आहे. त्रामुळे रुनिटीमध्रे 33 रुग्ण असताना संजीवनमध्रे 48 रुग्ण असताना आणि अल्फामध्रे 50 रुग्ण असताना वरीलप्रमाणे इंजेक्शन देण्रात आल्राचेही त्रांनी स्पष्ट केले.

कोविडसाठी संतलुक हॉस्पिटलकडून नकार

कोविड सेंटरसाठी पुन्हा संतलुक हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला विचारणा केली असता त्यांनी नकार दिला आहे. सध्या त्यांच्याकडे असलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग कमी झाले आहेत. तसेच नवीन लोकांना देण्यात येणारे मानधन जास्त असल्याने न परवडणारे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संतलुक कोविड सेंटर म्हणून सुरु झाल्यास शहराला आणखी 100 बेड मिळू शकतील व सर्व सुविधा चांगल्या मिळू शकतील असे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या