Monday, April 29, 2024
Homeनगरराहात्यातून 50 लाखांच्या सेंद्रीय खतांची परपस्पर विक्री

राहात्यातून 50 लाखांच्या सेंद्रीय खतांची परपस्पर विक्री

राहाता |वार्ताहर| Rahata

तालुक्यातील पिंपळस (Piplas) येथील अमेरिकन फेट्रो केम ऑरगॅनिक सेंद्रीय औषध निर्मिती (American Fetrochem Organic Organic Drug Production) करणार्‍या कंपनीच्या गोडाऊनमधून मॅनेजर व तीन कामगारांनी कंपनीचे मालक सचिन मनोहर पाटोळे यांना कुठलीही कल्पना न देता ऑरगॅनिक सेंद्रीय औषधाचे 514 बॉक्स किंमत 50 लाख 34 हजार 414 रुपयांची परस्पर विक्री करून फसवणूक केली (Cheated by mutual sale) असल्याची फिर्याद दिली आहे. राहाता पोलिसांनी (Rahata Police) पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मॅनेजर व तीन कामगार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a fraud case) केला आहे.

- Advertisement -

पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी सहा वर्षांपासून मुंबई भिवंडी (Mumbai Bhivandi) येथे अमेरिकन फेट्रो केम या नावाने ऑरगॅनिक सेंद्रीय औषधे निर्माण करण्याची कंपनी असून तिथे तयार होणारे औषधे गोडाऊनमध्ये ठेवून ते दुकानदारांपर्यंत पोहचवतो. त्या कामासाठी मी पिंपळस तालुका राहाता येते रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून दत्तात्रेय किसन राजभोज (राहणार कोल्हार) यांची नियुक्ती सन 2018 साली केली होती. माझे काम मुंबई येथे जास्त सुरू असल्याने मी खूप कमी पिंपळस येथे येतो.

मॅनेजर राजभोज याने माझा चांगला विश्वास संपादन केला. त्यामुळे गोडाऊनची चावी (Godown key) व संपूर्ण व्यवहार तो पाहत होता. त्याने माझी कुठलीही परवानगी न घेता मंगेश मच्छिंद्र बोराडे (राहणार कोल्हार), मंगेश केसरकर (राहणार ममदापूर) व गणेश तेलोरे (राहणार वाकडी) या तीन व्यक्तींची कंपनीमध्ये नेमणूक केली.

मला य बाबत कळले तेव्हा मी त्याला विचारले असता, तो म्हणाला हे तिघे विश्वासू व मेहनती आहे. आपल्या कंपनीला भविष्यात त्यांच्याकडून फायदा होईल. राजभोज ते तीन व्यक्ती कंपनीचा कारभार पाहत होते. करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती असल्याने माझे पिंपळस येथे येणे झाले नाही. 1 जुलै रोजी मी पिंपळस येथे आलो असता गोडाऊन मध्ये जाऊन कंपनीच्या साठवलेल्या मालाची पाहणी केली असता, विक्री करून शिल्लक असलेल्या मालाची मला मोठी तफावत आढळून आली.

मॅनेजर दत्तात्रेय राजभोज व इतर तिघांना कंपनीच्या रजिस्टर व औषधाच्या बॉक्स बाबत चौकशी केली असता, त्यांनी मला उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे मला त्यांच्यावर संशय आल्याने, मी बॉक्स बाबत खात्री केली असता मला माझ्या कंपनी मधील नॅचरल केल्प, अशियन फीड,फयुल, प्रोव्होक,युजिफाँर्स या ऑरगॅनिक सेंद्रीय औषधचे 514 बॉक्स किंमत 50 लाख 34 हजार 414 फसवणूक झाल्याचे आढळून आले. त्यावरून राहाता पोलिसांनी वरील चौघांविरोधात भादंवि कलम 408 418,420,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या