मनपाच्या बंडखोर नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गुरुपोर्णिमानिमित्त (Guru Poornima) मनपाच्या (Municipal Corporation) काही बंडखोर नगरसेवकांनी (Some rebellious councilors) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची ठाण्यात बुधवारी दुपारी भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्री शिंदेे यांना जळगावला येण्याचे निमंत्रण दिलेे . दरम्यान, आपण लवकरच जळगावला येणार (Jalgaon will come) असल्याचे आश्वासन शिंदेे यांनी दिले आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांसोबत बंडखोरी करुन महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांच्या बळावर भाजपला पाठिंबा दिला.त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन होवून शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत.

दरम्यान,जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या 27 बंडखोर नगरसेेवकांनी देखील दीड वर्षापूर्वी बंडखोरी करुन शिवसेनेला पाठिंबा दिला होता.या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हेच सूत्रधार होते. बंडखोरी केलेल्या 27 नगरसेवकांपैकी काही बंडखोर नगरसेवक हे शिंदे समर्थक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जळगाव मनपातील बंडखोर नगरसेवक अ‍ॅड.दिलीप पोकळे,नवनाथ दारकुंडे,चेतन सनकत,नगरसेविका पती गजानन देशमुख,कुंदन काळे यांनी बुधवारी ठाण्यात भेट घेतली. शिवाय स्व.आनंद दिघे यांच्या आश्रमात जावून स्मारकाचे दर्शन घेतले.

जळगावचा अनुशेष भरुन काढणार

जळगाव मनपातील काही बंडखोर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून जळगावला येण्याचे निमंत्रण दिले.मुख्यमंत्री शिंदे यांनी निमंत्रण स्वीकारले असून जळगावला लवकरच येणार असल्याचे आश्वासित केले.तसेच जळगाव शहरातील विकासाचा अनुशेष भरुन काढणार असून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही शिंदे यांनी आश्वस्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *