Friday, April 26, 2024
Homeजळगावसर्वसामान्यांसाठी ‘एचआरसीटी’चे दर माफक हवे !

सर्वसामान्यांसाठी ‘एचआरसीटी’चे दर माफक हवे !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांसाठी विविध दवाखान्यांमध्ये एचआरसीटी टेस्ट केली जात आहे, ती खूपच महागडी असून ती सर्वसामान्य जनतेला परवडणारी असावी म्हणून राज्य सरकारतर्फे तिचे दर 2000 रुपयांपर्यंत कमी होऊन अगदी माफक दरात ही टेस्ट करून मिळावी,अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

जागतिक महामारी बनलेल्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. राज्य शासनाच्या प्राथमिकतेवर सध्या केवळ राज्यातील जनतेचं आरोग्य हेच आहे.

म्हणून जे जे शक्य होईल ते ते प्रयत्न राज्य सरकारतर्फे केले जात आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 22 एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची झूमअ‍ॅपद्वारे रात्री 9 ते 12 या वेळेत आढावा तसेच उपाययोजना बैठक पार पडली.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना प्रादुर्भावाच्या समस्येवर मत व्यक्त केलं.

शहरात तसेच जिल्हाभरात कोरोना रुग्णांसाठी विविध दवाखान्यांमध्ये जी एचआरसीटी टेस्ट केली जात आहे, ती खूपच महागडी असून ती सर्वसामान्य जनतेला परवडणारी असावी म्हणून राज्य सरकारतर्फे तिचे दर 2000 रुपयांपर्यंत कमी होऊन अगदी माफक दरात ही टेस्ट करून मिळावी,अशी मागणी आरोग्यमंत्री तसेच जयंत पाटील यांच्याकडे केली.

तसेच खासगी दवाखान्यामध्ये प्रशासनातर्फे जी शासकीय ऑडीटर अधिकारी नेमलेला आहे. त्याठिकाणी स्वतंत्र बैठक कक्ष नेमून वाढीव बिलासंबंधी व इतर आरोग्य सोयींविषयी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल.

यासोबत सध्या महाराष्ट्रभरात ऑक्सिजन व रेमडेसेवीरचा जो तुटवडा जाणवत आहे. तो लवकरात लवकर दूर होऊन राज्य सरकार व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातील यांचा तुटवडा लवकरात लवकर दूर व्हावा जेणेकरून रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होईल.

तसेच जिल्ह्यात रेमडेसेवीर व ढेलळश्रर्ळूीारल या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करून अगदी रास्त दरात सहज उपलब्ध होईल अशा रीतीने ते रुग्णांना मिळावेत, अशा आशयाची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील केली.

या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण तसेच विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या