Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकरोड येथे घरपट्टीवसुली रेंगाळली

नाशिकरोड येथे घरपट्टीवसुली रेंगाळली

नाशिकरोड । Nashik road

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. नाशिकरोड विभागात घरपट्टी व पाणीपट्टीची गेल्या आर्थिक वर्षात फक्त 25 टक्केच वसूली झाली आहे.

- Advertisement -

नाशिकरोड विभागात गेल्या आर्थिक वर्षा अखेर 21 कोटी 32 लाख रुपये वसुलीचे लक्ष्य होते. त्यापैकी 12 कोटी 10 लाख रुपये घरपट्टी वसुल झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षा अखेरपर्यंत एकूण 70 कोटी तीन लाख रुपये थकबाकी होती.

त्यापैकी जुनी व गेल्या वर्षीची मिळून 17 कोटी 68 लाखाची वसुली झाली आहे. पाणीपट्टी वसुलीचे 13 कोटी एक लाखाचे लक्ष्य होते. त्यापैकी 5 कोटी 27 लाख रुपये वसुल झाले आहे.

जुनी व गेल्या वर्षीची मिळून एकूण 30 कोटी 41 लाख थकबाकी होती. त्यापैकी 9 कोटी 43 लाख वसूल झाले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षा अखेर हातगाडी व रस्त्यावरील विक्रेते यांच्याकडून दहा लाख 4 हजार रुपये, इतर परवानी फी 1 लाख 10 हजार रुपये व मनपा शॉपिंग सेंटर खुली जागा परवाना फी 1 कोटी 50 लाख 25 हजार रुपये वसूल झाले आहेत. गेल्या सव्वा वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने फक्त 25 टक्के वसुली झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या