Friday, April 26, 2024
Homeनाशिकआगामी निवडणुकांसाठी सज्ज : रेखा ठाकूर

आगामी निवडणुकांसाठी सज्ज : रेखा ठाकूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ( Local Body Election ) वंचित बहुजन आघाडीची ( Vanchit Bahnujan Aaghadi )सर्व तयारी पूर्ण झाली असून भाजपा सोडून कोणत्याही पक्षाशी युती करण्याची आमची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर ( Rekha Thakur ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमी वर नाशिक महानगर आणि जिल्ह्यात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बूथरचना आणि पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकूर नाशकात आल्या असता पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, जिल्हा अध्यक्ष पवन पवार, महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड व चित्रा कुर्‍हे, युवा जिल्हाध्यक्ष गौतम बागूल आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हीं बाब दुर्दैवीच असून त्याला महाविकास आघाडी आणि भाजपा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुका कोणत्या क्षणीही लागल्या तरीही त्यासाठी आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि शिवसेनेशी युतीबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक दौर्‍या दरम्यान पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना त्यांनी महानगर आणि जिल्ह्यातील पक्ष बांधणी आणि बूथ रचनेचा तालुकानिहाय आढावा घेतला. पक्ष श्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचविणार असल्याचे सांगत कुणाबरोबरही युती झाली अथवा न झाली तरी कार्यकर्त्यांनी आतापासूनच त्यादृष्टीने तयारी सुरू करावी,असे आवाहनही ठाकूर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या