Friday, April 26, 2024
Homeजळगावपो.नि.अशोक सादरेंच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करा

पो.नि.अशोक सादरेंच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

अवैध वाळूच्या विषयावरून एका पोलीस निरीक्षकाला आत्महत्या करावी लागल्याचे दुर्दैव असल्याचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. पोनि अशोक सादरे यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करावी अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केल्याने सभागृह अवाकच झाले.

- Advertisement -

जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत पुन्हा एकदा वाळुचा विषय चांगलाच तापला. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्याला धरून इतर आमदारही चांगलेच आक्रमक झाले.

काय म्हणाले आमदार

आ. खडसे-मुक्ताईनगरात वाळू माफियांचा धुमाकूळ

आ. चंद्रकांत पाटील – एकतर्फी कारवाई नको

ना. गुलाबराव पाटील – आमदारांनी फोन करू

नये,कारवाई होईल.

आ. अनिल पाटील-वाळूचे लिलाव का होत नाही?

आ. किशोर पाटील- तहसीलदार, तलाठी हप्ते घेतात

आ. मंगेश चव्हाण – वाळूमुळे पोलीस निरीक्षकाला आत्महत्या करावी लागली.

जिल्ह्यात वाळू तस्करीचे सिंडीकेट असून त्यात संपूर्ण यंत्रणा गुंतली असल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला. तसेच वाळूवर आवाज उठविला की तहसीलदारांचे हप्ते वाढतात असेही आमदारांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या प्रकरणाची नव्याने चौकशी केली जावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी वाळू माफियांवर एमपीडीए लावण्याची कार्यवाही सुरू असून सादरे प्रकरणाचीही माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या