Friday, April 26, 2024
Homeनाशिकपाच वेळा मुदतवाढ देऊनही 'इतकेच' अर्ज

पाच वेळा मुदतवाढ देऊनही ‘इतकेच’ अर्ज

नाशिक | Nashik

डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना आतापर्यंत तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही अवघे ७५ हजार ६० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे प्रवेश वाढावेत, यासाठी पुन्हा या अर्जांसाठी १३ आॅक्टाेबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे.

१० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला आता सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतरच्या डिप्लोमासाठी आत्तापर्यंत ७५ हजार ६० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत.

डीटीईकडून दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक); तसेच बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दोन्ही डिप्लोमा प्रवेशाला येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

तात्पुरती गुणवत्ता यादी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १७ ते १९ ऑक्टोबर अशी मुदत दिली आहे.

त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या