Friday, April 26, 2024
Homeनगरआजपासून दहावी, बारावीची पुनर्रपरीक्षा

आजपासून दहावी, बारावीची पुनर्रपरीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज शुक्रवार (दि.20) पासून दहावी आणि बारावीच्या पुनर्रपरीक्षा सुरू होत आहेत. यात दहावीसाठी 22 तर बारावीसाठी 11 केंद्रे आहेत.

- Advertisement -

याठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थी आणि परीक्षा घेणारी यंत्रणा याशिवाय अन्य व्यक्तींना मज्जाव करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढलेल्या आदेशात महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37 (4) अन्वये 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंंबर या कालावधीत इयत्ता 10 वी च्या 22 परीक्षा केंद्रांवर व इयत्ता 12 वीच्या 11 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत.

या परीक्षा केंद्रांवर व इतरत्र गर्दी होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन सार्वजनिक सुरक्षीततेस बाधा होऊ शकते. यामुळे संबंधित परीक्षा केंद्रात परीक्षा देणारे उमेदवार व परीक्षा आयोजन करणारे आयोजका या व्यतिरिक्त कोणासही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

– हे आहेत परीक्षा केंद्र

10 वीचे परीक्षा केंद्र

डी.डी काचोळे विद्यालय, एस.के. पाटणी (श्रीरामपूर),दादा चौधरी विद्यालय, आनंद विद्यालय, सीताराम सारडा विद्यालय (नगर), डॉ. विठ्ठलराव विखे विद्यालय (लोणी), सर डी. एम. पेटीट हायस्कूल, ज्ञान माता विद्यालय, अमृत वाहिनी मॉडले स्कूल (संगमनेर), कर्मवीर भाऊराव पाटील सेकंडरी विद्यालय (कोपरगाव), शारदा विद्यालय (राहता), वसंतदादा पाटील विद्यालय (पाथर्डी), अमरनाथ विद्यालय (कर्जत), अगस्ती विद्यालय (अकोले), बाळासाहेब भारदे विद्यालय (शेवगाव), गांधी कन्या विद्यालय (नेवासा), दादासाहेब घाडगे पाटील विद्यालय मुकींदपूरा (नेवासा), प्रगती विद्यालय, विद्यामंदिर प्रशाला (राहुरी), न्यू इंग्लिश स्कूल (पारनेर), राजमाता विजयाराजे शिंदे कला विद्यालय (श्रीगोंंदा), होशिंग विद्यालय (जामखेड).

12 वीचे परीक्षा केंद्र

मार्कडय माध्यमिक विद्यालय (नगर), के. जे. सोमय्या विद्यालय (श्रीरामपूर), शारदा ज्युनिअर कॉलेज (राहता), भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज (संगमनेर), रोहमारे विद्यालय (कोपरगाव), निर्‍हाळी विद्यालय (पाथर्डी) महात्मा गांधी विद्यालय (कर्जत) आर्टस सायन्स कॉलेज (अकोले), ज्ञानेश्वर महाविद्यालय, (नेवासा), आर्टस सायन्स कॉलेज (राहुरी), महादजी शिंदे ज्युनिअर कॉलेज (श्रीगोंदा).

- Advertisment -

ताज्या बातम्या