Friday, April 26, 2024
Homeक्रीडाआयपीएल १३ : बंगलोर-दिल्लीचा आज निर्णायक सामना

आयपीएल १३ : बंगलोर-दिल्लीचा आज निर्णायक सामना

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर होणार आहे.

- Advertisement -

दोन्ही संघांसाठी हा सामना करा वा मरा असा असणार आहे. कोलकता नाईट रायडर्सने रविवारी राजस्थान रॉयल्स संघाचा ६० धावांनी पराभव केला आणि त्यांनी थेट आठव्या स्थानावरून चौथे स्थान गाठले आहे. दिल्ली १४ गुणांसह तिसऱ्या तर बंगळूर १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर हैद्राबाद संघाच्या खात्यातही १२ गुण जमा आहेत.

साखळी फेरीतील अखेरचा सामना मुंबई विरुद्ध हैद्राबाद यांच्यात शारजा येथे होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. तर पराभूत संघाला हैद्राबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.

हैद्राबाद संघाची धावगती दिल्ली , बंगळूर , कोलकाता संघांच्या तुलनेत वरचढ आहे. दोन्ही संघाना विजय मिळवण्यासाठी फार कसरत करावी लागणार आहे. दुबई येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने बंगळूरला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळूर सज्ज आहे.

दिल्लीला मागील ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर बंगळूर संघालाही मागील ३ लढतींमध्ये पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे नेमका कोणता संघ विजयी होणार हे सांगणे कठीण आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या