Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोना काळात RBI कडून मोठा दिलासा!

करोना काळात RBI कडून मोठा दिलासा!

दिल्ली l Delhi

भारतातील करोना विषाणू संसर्गाच्या वेगाला अद्यापही ब्रेक लागला नाही. देशात करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

देशाची अर्थव्यवस्था नुकतीच रुळावर येत असताना करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेसमोर संकट उभं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच संभाव्य आर्थिक धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं आर्थिक आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज घोषणा केली.

दरम्यान, आरबीआय गव्हर्नर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘करोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. तसेच करोनाच्या दुसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी बँकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत रूग्णालय, ऑक्सिजन पुरवठा करणारे, लस आयात करणारे, कोविड औषधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.

यासह रिझर्व्ह बँकेने केवायसीवर मोठी सूट दिली असून व्हिडिओ केवायसी आणि नाॉन फेस टू फेस टू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. तसेच बँकांना कोविड लोन बुक बनविण्याच्या सूचना तसेच प्राधान्याने प्रायोरिटी सेक्टरसाठी इन्सेन्टिव्ह देण्याची घोषणाही केली आहे. आरबीआयने २५ कोटी रूपये कर्ज घेणाऱ्या वैयक्तिक, लहान कर्जदारांना कर्जाची पुनर्रचना करण्याची दुसरी संधी दिली आहे.

तसेच,एप्रिलमध्ये गेल्यावर्षीपेक्षा रेल्वे मालवाहतुकीत ७६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये ऑटोमोबाईल नोंदणी मार्चच्या तुलनेत कमी झाली. पण ट्रॅक्टर विभागात तेजी आल्याचे पाहायला मिळाल्याचे दास यांनी म्हटले.

तृणधान्य आणि डाळींच्या किंमती आणि पुरवठा चांगला राहण्यात सामान्य स्वरुपाचा पाऊस मुख्य भूमिका बजावतो. एप्रिल २०२१ पर्यंत आयात निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. परकीय चलन साठ्यामुळे जागतिक स्तरावर गती वाढविण्याचा आत्मविश्वास आला आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या