Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशबँकांची NEFT सुविधा 'या' तारखेला राहणार बंद; RBI ची माहिती

बँकांची NEFT सुविधा ‘या’ तारखेला राहणार बंद; RBI ची माहिती

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर सुरु आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

- Advertisement -

पैशांचे ऑनलाईन हस्तांतरण करण्यासाठी वापरली जाणारी NEFT सेवा येत्या शनिवारी (२३ मे) मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद राहणार असल्याचे RBI ने जाहीर केले आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड्स‌ ट्रान्सफर (NEFT) या यंत्रणेचे व्यवस्थापन RBI तर्फे केले जाते. या सेवेची प्रणाली तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम शनिवारी मध्यरात्रीनंतर केले जाणार आहे. या कारणाने शनिवार-रविवारच्या (२३ मे) रात्री १२ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत १४ तास ही सेवा बंद राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने कळविले आहे. या काळामध्ये RTGS प्रणाली सुरूच राहणार असल्याचेही बँकेने जाहीर केले आहे.

NEFT च्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जाऊ शकतो. या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध असणं गरजेचं आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने NEFT सेवा निशुल्क केली आहे. ही सुविधा पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. मात्र आता ही सुविधा २४ तास उपलब्ध असते.

इतर कोणत्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर होऊ शकतात?

बॅंक NEFT व्यतिरिक्त IMPS आणि RTGS सर्व्हिसदेखील देतात.

IMPS म्हणजेच इमीडिएट मोबाईल पेमेंट सर्व्हिस. IMPS द्वारे कोणत्याही खातेधारकाला कुठेही २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस पैसे पाठवता येतात. या सेवेद्वारे काही सेकंदातच पैसे खातेधारकाला मिळतात. IMPS सेवेद्वारे १ रुपयापासून २ लाख रुपयांपर्यतची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. अनेक बॅंकांमध्ये IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्कसुद्धा द्यावे लागते.

RTGS ही सुविधा मोठ्या रकमेच्या ट्रान्सफरसाठी असते. म्हणजेच तुम्ही RTGS द्वारे २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करू शकता. ही सेवादेखील रियल टाईम सिस्टमवर काम करते म्हणजेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी जसे तुम्ही ओके केले, तसे पैसे दुसऱ्या खात्यात जमा होतात. सर्वसाधारणपणे या सेवेद्वारे कमाल १० लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. मात्र कॉर्पोरेट बॅंकिंगमध्ये ही रक्कम कोट्यवधींचीदेखील असू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या