Tuesday, April 23, 2024
Homeजळगावअवैद्य गुटखा विक्री बंद करण्याची रयत सेनेची मागणी

अवैद्य गुटखा विक्री बंद करण्याची रयत सेनेची मागणी

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

राज्यात गुटखा विक्रीवर शासनाची बंदी असताना चाळीसगाव शहर व तालुक्यात सर्रासपणे गुटखा विक्री केली जात असल्यानजे तरुण पिढी व्यवसनाधिन झाले आहे. पूर्ण पिढी या व्यसनामुळे उध्वस्त होत असून पर्यायाने कुंटुंबाची देखील वाताहत होत असल्याने, चाळीसगावात अवैध गुटखा विक्री बंदकरून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन येथील तहसिलदार यांच्या मार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना देण्यात आला.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे की, शहरात प्रत्येक पान टपर्‍यावर बिनधास्त गुटखा विक्री होत असून गुटखा सेवनामुळे तरुणांचे भावी आयुष्य उध्वस्त होत आहे. इतर जिल्ह्यात अवैध गुटखाविक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणार्‍यावर धडक कारवाई केली जात नसल्याने जनमानसात अन्न भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांवर नाराजी आहे.

यापूर्वी रयत सेनेच्या वतीने राज्यात गुटखा बंदी झाल्यापासून अन्न भेसळ विभागाकडे वेळोवेळी गुटखा विक्री करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील अन्न भेसळ विभाग याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करून कारवाई करत नसल्याने चाळीसगावात अवैध गुटखा विक्री बंदकरून अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी. यासंबंधीचे निवेदन चाळीसगाव तहसिलदार यांच्या मार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या कडे देण्यात आले आहे. तसेच गुटखा विक्री बंद न झाल्यास रयत सेना उग्र आंदोलन करेल असा इशार रयतसेनेतर्फे देण्यात आला आहे.

निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,शहर कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, राजेंद्र मोरे,राजेंद्र पवार,संजय चौधरी,सागर मोरे यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या