Saturday, April 27, 2024
Homeनाशिककच्च्या मालाची दरवाढ; लघू, मध्यम उद्योग अडचणीत

कच्च्या मालाची दरवाढ; लघू, मध्यम उद्योग अडचणीत

सातपूर । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे मागील वर्षी कच्चा माल आयात होऊ शकला नाही. त्याचा मोठा फटका विविध क्षेत्रांंना बसला होता. त्यात प्रामुख्याने ऑटो इंजिनिअरिंग क्षेत्र, कोरोगेटेड उद्योग, आईस्क्रीम उद्योग व विविध पूरक उद्योगांना बसला होता. लॉकडाऊनच्या काळात विविध उत्पादनांच्या कच्च्या मालाचा दर अचानक 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढविण्याात आला. त्यामुळे संबंधित उद्योग संकटात सापडले आहेत. यासह देशांतर्गत स्पर्धा वाढल्याने रास्त किंमत देणे अडचणीचे झाले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन व त्यानंतरच्या परिस्थितीमुळे पॅकिंग क्षेत्रातील उद्योगांचा कच्चा माल असलेला द्राक्ष स्ट्रॉबेरीच्या पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाण बॉक्सेसची मागणी होती. मात्र या उद्योगासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या अनेक उद्योजकांनी आगाऊ ऑर्डर्स त्यावेळच्या दरात घेतल्या होत्या. मात्र कच्च्या मालामध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने कोरोगेटेड बॉक्सचे उत्पादनमूल्य पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी मागील दरात ऑर्डर्स तयार करून देणे परवडत नसल्याने अचानक झालेली दरवाढ काळजी वाढवणारी ठरत आहे.

इतर अनेक उद्योगांमध्ये सुटे भाग वेळेवर पोहोचत नसल्याने दरांमध्ये निर्माण होत असलेली तफावत पाहता स्पर्धात्मक किंमत देणे अडचणीचे होत असून उद्योगांवर गंभीर संकट घोंघावू लागले आहे. तसेच 12 ते 24 मे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील उद्योग बंद होते. त्याचाही परिणाम निर्यातक्षम उद्योगांवर झाल्याचे दिसून येते. मुख्य उत्पादन करणार्‍या उद्योजकांनी अडचणीच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून इतर पुरवठादारांची चाचपणी सुरू केल्यामुळे लघु व मध्यम उद्योग अडचणीत सापडले आहेत.

वाहन, इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक, फळे, द्राक्षे यांच्या पॅकेज़िंगकरिता मोठ्या प्रमाणात कोरोगेटेड बॉक्सचा वापर होतो. जागतिक बाजारात निर्यातही केली जाते. नाशिक जिल्ह्यात या क्षेत्रातील जवळपास दीडशे उद्योग असून दरमहा किमान 15 हजार टन उत्पादन घेतले जाते. दीड हजारांच्यावर कामगार यावर अवलंबून आहेत. त्यांचाही रोजगार संकटात आला आहे.

राजेंद्र छाजेड, संचालक, महावीर इंडस्ट्रीज, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या