Friday, April 26, 2024
Homeनगरखासदार लोखंडेंना लोकसभा मतदारसंघात फिरकू देणार नाही- रावसाहेब खेवरे

खासदार लोखंडेंना लोकसभा मतदारसंघात फिरकू देणार नाही- रावसाहेब खेवरे

उंबरे |वार्ताहर| Umbare

जनमाणसात प्रतिमा नसतानाही केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच केवळ पंधरा दिवसातच खासदारपदी निवडून आलेल्या खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेल्याने त्यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या रोषास पात्र ठरल्याने त्यांना गंभीर परिणारांना सामोरे जावे लागणार असून त्यांना पुन्हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात फिरकू देणार नसल्याचा इशारा उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पै.रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे. त्यांनी आता पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान खेवरे यांनी खा.लोखंडे यांना दिले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविलेल्या अनेक राजकीय रथीमहारथींना खासदार होण्यासाठी मोठा राजकीय संघर्ष करावा लागला. यात पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे पाटील, दादापाटील शेळके, खा.डॉ सुजय विखे हे सहजासहजी खासदारकीपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांना या पदासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र लोखंडे हे अवघ्या 17 दिवसात जनसामान्यांमध्ये प्रतिमा खराब असतानाही ठाकरे यांच्यामुळेच खासदार झाले. त्यांनी पक्षाला सोडू नये. त्यांनी उध्दव ठाकरे यांना भेटावे, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

असा इशारा शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांनी दिला. खेवरे म्हणाले संघटना, पक्ष, उद्धव ठाकरे हे अडचणीत आहेत, हे दुर्देव आहे. मात्र, सत्ता व पदासाठी पक्ष सोडून गेल्यास खा. लोखंडे यांना त्याचा हिशोब द्यावाच लागेल. मी त्यांना असे काही करू नका, पक्ष सोडून जाण्याची वेळ नाही, अशी विनंती केली. मात्र, गेल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला असल्याचे खेवरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या