Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर; वाजे गटाची बाजी

सिन्नर बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर; वाजे गटाची बाजी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झाले आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली आहे. सभापतीपदी डॉ. रवींद्र पवार यांची निवड झाली असून उपसभापतीपदी सिंधुताई कोकाटे यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. यामुळे बाजार समितीच्या आवारात तणाव झाला होता.

शाब्दिक चकमक उडाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या