Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर शिवसेना तालुकाप्रमुख पदी भोये यांची निवड

त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुकाप्रमुख पदी भोये यांची निवड

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीमुळे राज्यात शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागला गेला आहे. तसेच शिवसेनेच्या या फुटीचे परिणाम जिल्ह्यासह तालुका पातळीवर देखील बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या या फुटीचे परिणाम नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुद्धा पाहायला मिळाले होते.

- Advertisement -

त्यानंतर आता शिवसेनेच्या (शिंदे गट) त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख पदी रवींद्र भोये यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांच्या हस्ते देण्यात आले.

रवींद्र भोये यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून सर्वसामान्यांच्या अडचणींना प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करोना काळात त्यांनी तालुक्यात मुख्य भूमिका देखील बजावलेली आहे. त्यांच्या या कामांची दखल घेऊन शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी भोये यांच्याकडे त्र्यंबकेश्वर तालुक्याची (Trimbakeshwar Taluka) तालुकाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे.

दरम्यान, यावेळी (शहर) जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, युवा नेते मिथुन राऊत, त्र्यंबकेश्वर उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे, अशोक लांघे, विठ्ठल पवार, अरुण काशीद, विष्णू बेंडकोळी, आंबादास बेंडकोळी, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या