Friday, April 26, 2024
Homeक्रीडाअश्विनचा पराक्रम : भारताल हव्यात विजयासाठी ४९ धावा

अश्विनचा पराक्रम : भारताल हव्यात विजयासाठी ४९ धावा

भारत आणि इंग्लंडदरम्यान डे-नाइट कसोटी अमहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सुरू आहे. अक्षर पटेल आणि अश्विन या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावांत फक्त ८१ धावांपर्यंत मजल मारु शकला. यामुळे भारताला विजयासाठी अवघे ४९ धावांचे आव्हान आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने या कसोटीत इतिहास घडवला आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जोफ्रा आर्चरची विकेट घेत अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेण्याचा टप्पा गाठला आहे. अक्षर पटेल यानं पुन्हा एकदा पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे. तर अश्विन यानं दुसऱ्या डावांत चार गड्यांना तंबूत धाडलं. वॉशिंगटन सुंदर यानं एक बळी मिळवला. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत सहा गडी बाद केले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल यानं ११ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तर अश्विन यानं सात गडी बाद केले आहेत.

- Advertisement -

दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही फलंदालाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक २५ धावा केल्या. तर कर्णधार जो रुट अवघ्या १९ धावांवर अक्षर पटेलचा शिकार ठरला. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आलं नाही. तर फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या