Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडारवी शास्त्री म्हणतात रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न गेलेलंच बरं, कारण..

रवी शास्त्री म्हणतात रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न गेलेलंच बरं, कारण..

मुंबई l Mumbai

BCCI ने नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) तिनही प्रकारच्या क्रिकेट संघात निवड झाली नव्हती. यासंदर्भात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “मी स्वत: एक क्रिकेटपटू आहे.1991 मधील ऑस्ट्रेलिया दौरा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा होता.मी त्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला असता तर बर झालं असतं. कारण मी तंदुरुस्त नव्हतो. मी 3-4 महिन्यांची विश्रांती घेतली असती तर भारतीय संघासाठी कदाचित 5 वर्षे पुन्हा खेळू शकलो असतो. म्हणूनच मी अनुभवातून बोलत आहे. रोहितचं प्रकरण यासारखच आहे. रोहित शर्मा हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त न होता त्यान दौर्‍यावर जाऊ नये.” असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच “एखाद्या खेळाडूसाठी दुखापत होणे म्हणजे सर्वात मोठी निराशाजनक बाब आहे. आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. लवकरात लवकर त्यातून सावरण्याचा आपण प्रयत्न करतो. अडचणींचा सामना करून आपल्याला खेळायचे असते, परंतु आपण 100% तंदुरुस्त आहात की नाही हे केवळ आपल्यालाच माहित असते.”

आयपीएल 2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.त्यानंतर तो मुंबई इंडियन्सकडून खेळला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या