Wednesday, April 24, 2024
Homeजळगाव'अशांत' रावेर ; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

‘अशांत’ रावेर ; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

रावेर – Raver – प्रतिनिधी :

गेल्या 46 वर्षाची दंगलीची परंपरा असलेल्या रावेरमध्ये दंगलीवर कायमस्वरूपी इलाज करण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन आखला असून,आगामी काळात दंगल करण्यासाठी कुणाची हिंमत होणार नाही अशी कायमस्वरूपी व्यवस्था पोलीस खात्याकडून लावण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.

- Advertisement -

यात दंगलग्रस्त भाग अशांत क्षेत्र घोषित करणे व दंगलीतील आरोपींवर मोक्कासारखी कारवाई,यादोन्ही कारवाया दंगेखोराचे उखळ पांढरे करणाऱ्या आहे.

अशा गंभीर कारवाया दंगलग्रस्त भागात होणारे रावेर महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार आहे.अजून काही आरोपींना मोक्का लावण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यापुढे सादर करण्यात आला असून,अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठवण्यात आलेला प्रस्ताव मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली आहे.

रावेरात वारंवार घडणार्‍या दंगली पोलीस प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखी आहे.46 वर्षापासून सुरु झालेल्या दंगलीमुळे आता पर्यंत फार मोठे नुकसान शहराचे झाले आहे.दंगलीनंतर राष्ट्रीय संपत्ती व खाजगी मालमत्ता यांचे होणारे नुकसान,भरून न निघणारी अपरिमित हानी आहे.

दंगलीनंतर दंगेखोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने दंगली घडत असल्याचे पोलीस प्रशासनाला वाटत आहे आणि या दंगली रोखण्यासाठी आता पोलिसांनी दंगलग्रस्त भागातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी,आरोपीकडून हि रक्कम वसूल करण्यासाठी अशांत क्षेत्र घोषित करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर मंत्रालयीन स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

तसेच दंगीलीत 5 आरोपींवर मोक्का सारखी मोठी कारवाई करून दंगेखोरांचे धाबे दणाणले आहे.आणखी 10 जणांचे प्रस्ताव देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली.

आरोपींचे मालमत्ता किती याबाबत माहिती संकलन

रावेर दंगलीतील आरोपी आताच्या दंगलीत दोनापेक्षा अधिक गुन्ह्यात सहभागी आहे.त्यामुळे त्यांना अधिक संघर्ष करावा लागत आहे.आणि आरोपींना अधिकाधिक त्रास कसा होईल याचा पुरेपूर बंदोबस्त पोलिसांनी केला आहे.

दंगलीतील आरोपींचा सत्कार केला म्हणून अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे.आताच 5 आरोपींवर मोक्का कारवाई,आणि पुढील काळात अशांत क्षेत्र अशी कारवाई चालवली असून,या आरोपीची मालमत्ता किती रुपयांची याबाबत पोलिसांनी माहिती संकलित केली असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.

अशांत क्षेत्र आणि मोक्का कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी रावेर दंगलीचा पुरेपूर आभ्यास केला असून,या दंगलीची मालिका खंडित करण्यासाठी त्यांनी मार्च महिन्यातील दंगलीला गांभीर्याने घेतले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने रावेर दंगलीतील आरोपींना मोक्का व अशांत क्षेत्र घोषित करून नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे.आता पर्यंत 152 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर एकाच दंगलीचे 6 गुन्हे दाखल केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या