Tuesday, April 23, 2024
Homeजळगावरावेर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक निलंबित

रावेर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक निलंबित

रावेर|प्रतिनिधी-येथील पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक सलीम तडवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काही दिवसापूर्वी आठ ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करून धमाका केला होता.यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती.यानंतर रावेरात झालेल्या कारवाईने आणखी खळबळ उडाली आहे. येथील कनिष्ठ सहा.सलीम तडवी हे कार्यालयात सतत गैरहजर व माहिती अधिकार अपील विहित कालावधीत बजावले नाहीत.निकाल वेळोवेळी लावले नाही.समाज कल्याण योजनेचे प्रस्ताव मंजुरी करिता पाठवले नाहीत. त्याबाबत गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.त्या अनुषंगाने सलीम तडवी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.त्यांना याकाळात एरंडोल पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.सोमवारी रावेर पंचायत समितीतून कार्यमुक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या