Friday, May 10, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेत उंदरांचा राडा

जिल्हा परिषदेत उंदरांचा राडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फाईल गायब होणे, गहाळ होणे, दिवसेंदिवस एकाच टेबलावर पडून राहणे असे प्रकार जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) सुरू असतानाच आता अनेक फायलींवर उंदरांनी (Rat) ताव मारल्याचा प्रकार समोर आला आहे….

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला असून, कामकाजाच्या फायलींचे व इतर कागदपत्रे कुरतडली जात आहेत .तसेच औषधांसाच्या सॅम्पलवरही हे उंदीर ताव मारत आहेत. या उंदरांपासून बचाव करण्याची मागणी विभागातील सेवकांकडून करण्यात येत आहे.

कृषी विभागात (Agriculture Department) आठवड्यातून एक तरी उंदीर मरून पडत असल्याने कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबरच विभागातील सेवकांना दुर्गंधीतच नाक दाबून कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे या विभागातील सेवक त्रस्त झाले आहेत

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातीळ तळमजल्याला कृषी विभागाचे कार्यालय आहे. याच विभागाच्याजवळ तळमजल्यावर जिल्हा परिषदेचे भांडार आहे. तेथे फायलींचे गोदाम आहे. या भांडारामध्ये मुख्यालयातील विविध विभागांतील फायलींचे गठ्ठे मोठ्या प्रमाणावर पडून आहेत.

यामुळे या भागात उंदरांचा कायम सुळसुळाट असतो. हे उंदीर शेजारीच कृषी विभागाच्या कार्यालयातही येत आहेत. यामुळे सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर हे उंदीर रात्रभर कागदपत्रे, फायली कुरतडतात. इतकेच नव्हे, तर सेवकांच्या टेबलावरील कप्यांमध्ये, तसेच कपाटांमध्ये उंदीर उड्या मारतात.

यामुळे कार्यालयात दाखल झाल्यानंतर सकाळी कार्यालयात आणीबाणीसारखे वातावरण असते. काही उंदीर मरून पडल्याचे दिसून येत आहे. उंदीर सापडत नसल्यामुळे सेवकांना त्या दुर्गंधीतही नाक दाबून काम करावे लागत आहे.

कार्यालयात उंदरांनी ठिकठिकाणी बिळे केल्याचे दिसून येत आहे. मात्र, वारंवार सांगूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून या उंदरांचा बंदोबस्त केला जात नसून काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याने सेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या