रेशनिंगचा साडे बारा टन तांदुळाचा ट्रक पकडला

jalgaon-digital
1 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलिसांनी धडक कारवाई करत तालुक्यातून संगमनेर येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक पकडला.

यावेळी ट्रकमध्ये साडे 12 टन तांदूळ गोण्यात भरलेला होता.

काल रविवार असतानाही काळ्या बाजारातील रेशनिंगचा साडे बारा टन भरलेला तांदूळ घेऊन ट्रक जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे यांना समजली.

त्यानुसार त्यांनी पाठवलेल्या पथकाने सायंकाळी 6:30 वा दरम्यान राजूर येथून संगमनेरला जाणारा साडे बारा टन रेशनिंगचा तांदूळ भरलेला एम.एच.17 ए.जी.2483 हा ट्रक मनोहरपूर फाटा येथे पकडून अकोले पोलीस स्टेशनला आणला.

यावेळी चालक शहेबाज मणियार याने सदर तांदूळ हा राजूर येथून आणला असल्याचे सांगितल्याचे समजते. सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी अकोले पोलिस स्टेशन भेट देऊन चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे सुचना दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *