Friday, May 10, 2024
Homeनगररेशनिंगचा गहू व तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पकडला

रेशनिंगचा गहू व तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पकडला

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

शासकीय रेशनिंगचा गहू व तांदळू घेऊन जाणारा ट्रक अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने पकडून तालुका पोलिसांकडे दिला आहे.

- Advertisement -

या ट्रकमध्ये (क्र. एमएच- 18 एपी- 9099) 14 टन गहू व 10 टन तांदुळ असा एकुण 20 लाख रूपयांचा ऐवज होता. तो गहू व तांदुळ काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

नगर- पुणे रोडवरून एका ट्रकमध्ये शासकीय रेशनिंगचा संशयित मालची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी यांच्या पथकाला कारवाई बाबत आदेश दिले. उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी पथकासह चास शिवारात ट्रक अडविला.

ट्रक चालक दादासाहेब बाबासाहेब गाजरे (वय- 32 रा. चिंचोली फाटा ता. राहुरी) याला ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता यामध्ये 14 टन गहू व 10 टन तांदुळ मिळून आला. पथकाने मालासह ट्रक व चालकाला ताब्यात घेऊन तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबतची माहिती नगर तालुका तहसिलदार उमेश पाटील यांना कळविण्यात आली आहे. याबाबत तपास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या