Wednesday, April 24, 2024
Homeनगररेशन चोरीप्रकरणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संदीप शेणकरला अटक

रेशन चोरीप्रकरणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संदीप शेणकरला अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील रेशन घोटाळ्या प्रकरणी उशिरा का होईना अकोले पोलिसांनी प्रमुख आरोपींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.अकोले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असणार्‍या संदीप भानुदास शेणकरसह कोतूळ येथील शिवाजी मारुती मुठे यास आज मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

अकोले शहरालगत असलेल्या नवलेवाडी येथे 2 नोव्हेंबर 21 रोजी एका घरामध्ये व आयशर टेम्पोत रेशनिंगचे 182 कट्टे सह वाहन असा 9 लाख 80 हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त करून दत्ता सुदाम चोथवे व खंडु काशिनाथ भारमल याच्या विरोधात अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता..

अकोले तालुक्यात चार महिन्यांपूर्वी राजूर पोलीस स्टेशन समोर अवैद्य रेशन भरलेल्या तीन गाड्या पकडून गुन्हा दाखल करण्याची व त्यानंतर ऐन दिवाळीत नवलेवाडी येथे रेशनिंगचा तांदूळ पकडल्याची घटना घडली होती. नवलेवाडी मधील एका गोडाऊन मध्ये महाराष्ट्र शासन शिक्का असलेल्या गोण्यामध्ये रेशनिंगचा तांदूळ धान्यसाठा मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख,राज गवांदे, शंभु नेहे आदी भाजप कार्यकर्त्यांनी पाळत ठेवुन पकडून दिला होता.तर अकोले पोलिसांत त्यावेळी पुरवठा अधिकारी सतीशकुमार कृष्ण धारकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून पुढील तपास करण्यात आला.

दत्ता सुदाम चोथवे रा. राजूर यांनी आयशर गाडी वरील चालक खंडू काशिनाथ भारमल रा. राजूर याच्या मदतीने. एक लाख 12 हजार 200 रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या तांदळाच्या गोण्या पत्रा शेड मध्ये आढळलेल्या प्रति किलो 30 रुपये दराच्या खाकी रंगाची बारदाण त्यावर महाराष्ट्र शासन असे नाव लिहिलेले होते. तसेच एक लाख 60 हजार 500 रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 107 तांदळाच्या गोण्या आँयशरकंपनीचा गाडीत मध्ये आढळले होते तर सात लाख रुपये किमतीचा टाटा आयशर गाडी क्रमांक 17 डी वाय 3518 व काही रिकाम्या धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या गोण्या असा मुद्देमाल 9 लाख 80 हजार रुपयांचा सापडला होता तर वरील वर्णनाचा व किमतीचा महाराष्ट्र शासनाने मोफत वितरणासाठी दिलेल्या तांदळाच्या गोण्यांची जागेवर आदला बदल करून तांदूळ अवैध साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले व तिथून पसार झाले या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी दत्ता चोथवे व खंडू भारमल यांच्याविरोधात गुन्हा रजि.442/202 अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 317 प्रमाणे यापूर्वी गुन्हा दाखल केला होता.

तर अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अकोले तालुक्यात अनेकदा अवैध रेशनिंगचा धान्यसाठा पकडला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता.पुन्हा महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेशनिंगच्या या काळ्या बाजारात अनेक बडे मासे गुंतले असल्याची चर्चा पहिल्या पासूनच सुरू होती.अखेर अकोले पोलिसांनी उशिरा का होईना या प्रकरणी शिवाजी मारुती मुठे (वय-40,रा कोतूळ,ता अकोले) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या संदीप भानुदास शेनकर (वय 39,रा कारखाना रोड,अकोले) यांना मंगळवारी रात्री अटक केली आहे.अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करत आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात चाललेला रेशनिंग चा काळाबाजार उघड केला होता. चार महिन्यापूर्वी राजूरमध्ये रेशनिंगचा काळाबाजार उघड झाला होता. त्यानंतर पुन्हा नवलेवाडी मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी रेशनिगचा काळा बाजार उघडकीस आणला होता.दिवाळीच्या काळात गरीब माणसाच्या हक्काचे अन्नधान्य चोरणार्‍या पांढर्‍या पेशातील या बगळ्यांना व त्यांच्या मोहरक्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या