रेशनदुकानदाराची लाभार्थ्यांना मारहाण, रेशनदुकान सील !

jalgaon-digital
1 Min Read

पुनदखोरे | Punadkhore

दोन दिवसांपुर्वीच पुणेगांव येथील रेशनदुकानदाराने लाभार्थ्यांना मोफत आलेले रेशन त्यांनाच विकल्याचा प्रकार घडला. त्या प्रकरणाची शहानिशा होत नाही, तोच तालुक्यातील रवळजी येथील रेशनदुकांनदार राजेंद्र वाघ यांनी चक्क लाभार्थ्याला मारहाण करून गैरव्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान संबधीत रेशनदुकानदारावर कायदेशीर कारवाई करून दुकान रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली होती. या आशयाचे निवेदन प्रांतधिकारी व तहसिलदार , कळवण यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज (दि.०९) रोजी पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांनी सदर रेशन दुकान सील केले आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, तालुक्यातील रवळजी येथील चक्रपाणी महीला बचत गटाच्या नावाने ( दु.न.४६ ) हे रेशन दुकान असुन , गावातीलच असणारे राजेंद्र वाघ नामक व्यक्तीला सदर दुकान चालविण्यास दिले आहे.

काही दिवसांपुर्वी गावातील लाभार्थी स्वप्नील वाघ हा रेशन घेण्यासाठी गेला असता , त्यास ५ किलो गहू कमी देण्यात आले. त्याचा जाब संबधीत दुकानदारास विचारला असता, दुकानदाराने लाभार्थीस लाथा बुक्यांने मारहाण केली.

त्यामुळे संबधीत रेशनदुकानदार राजेंद्र वाघ याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्याचे दुकान रद्द करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली होती. त्या अनुषगाने आज रवळजी येथील रेशन दुकान सिल केल्याने तालुक्यातील भ्रष्ट रेशन दुकांनदारांचे धाबे दणाणले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *