Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर : रेशन धान्य प्रकरणातील आरोपीला अटक

नगर : रेशन धान्य प्रकरणातील आरोपीला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील मार्केटयार्ड व केडगाव (Kedgav) परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या 41 लाख रूपयांच्या रेशन धान्य प्रकरणातील (Ration grain case) आरोपी संग्राम रासकर याला कोतवाली पोलिसांनी भिंगार (Bhingar) येथे अटक केली. दरम्यान आतापर्यंत या गुन्ह्यात नऊ आरोपींना अटक (Criminal Arrested) करण्यात आली असून एक जण पसार आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यामध्ये कोतवाली पोलीस व जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी मार्केटयार्ड (Marketyard) आणि केडगाव (Kedgav) परिसरामध्ये गोदामावर एकाचवेळी छापेमारी करून सुमारे 41 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन फिर्यादीवरून असून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातील आठ जणांना अटक करण्यात आली होती. दोन जण पसार होते त्यातील संग्राम रासकर (Sangram Raskar) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या