Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारशहादा येथे भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा

शहादा येथे भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा

शहादा | ता. प्र. shahada

येथील श्री नारायण भक्तीपंथ नारायमपूरम तीर्थच्या वतीने भगवान (shri Jagannath) श्री जगन्नाथ यांची भव्य शोभा रथयात्रा (Rathyatra) काढण्यात आली. या रथयात्रेत विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध लेझीम नृत्य, कलशधारी महिलांचे गरबा नृत्य आणि वारकऱ्यांच्या वेशात भजनावर टाळ मृदुंगाने ठेका धरीत ज्येष्ठ व्यक्तींचे नृत्य अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय उस्ताहात काढण्यात आलेल्या भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते.

- Advertisement -

येथील श्री नारायणभक्ती पंथ नारायणपुरम तीर्थच्या वतीने शहादा शहरातून भगवान श्री जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढण्यात आली. येथील प्रेस मारुती मैदानापासून अतिशय भक्तिमय वातावरणात निघालेली ही रथयात्रा दोंडाईचा रोड , बसस्थानक मार्गे डोंगरगाव ते दादावाडी जवळ विसर्जित करण्यात आली. आज जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथांची भव्यरथ यात्रा काढण्यात येते. त्याच धर्तीवर शहाद्यातही रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती.

रथयात्रेदरम्यान धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक व शारजाई दामोदर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकावर सुंदर व तितकेच शिस्तबद्ध लेझीम नृत्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. जागोजागी महिलांचे गरबा नृत्य आणि मालपुर येथील भजनी मंडळाचे वारकरी वेशात टाळ मृदुंग हातात घेऊन भगवंताच्या भजनांवर तल्लीन होऊन ठेका धरीत होते. भगवान जगन्नाथांचा रथ ओढण्यासाठी भाविक भक्तिमय झाले होते. शहरातील विविध मार्गांवरून निघालेली ही रथयात्रा शिस्तबद्ध होती. या रथयात्रेमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नारायणपुरम भक्ती पंथाचे जगदीश पाटील, शांतीलाल पाटील, योगीराज जाधव, नरेंद्र पाटील, विशाल गारोळे, अशोक पाटील आदी भाविकांनी परिश्रम घेतले. रथयात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या