Wednesday, April 24, 2024
Homeधुळेजुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांवर गुन्हा

जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांवर गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील रतनपुरा (बोरकुंड) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला व 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून 29 हजार 770 रुपये, जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

रतनपुरा येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने गावातील बस स्टॅण्डजवळ सावता महाराज मंदिरामागे ज्ञानेश्वर रामदास माळी याच्या घराजवळ जुगार खेळत असतांना ज्ञानेश्वर रामदास माळीस 11 जण आढळून आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य आणि 29 हजार 770 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोना पवन मंडाले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे ज्ञानेश्वर रामदास माळी, संतोष अर्जुन वाडीले, कैलास भिला अहिरे, गोपाळ धर्मा माळी, प्रवीण गुलाब भोई, ज्ञानेश्वर बाबुलाल माळी, जगदीश उत्तम पाटील, रवींद्र आनंदा माळी, जकीलखॉ इस्माईलखॉ पठाण, भाऊसाहेब महादू सोनवणे आणि ज्ञानेश्वर सुभाष बिरारी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोहेकॉ राजेंद्र मोरे, अन्वर पठाण, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, प्रकाश भावसार, पवन मंडाले, राकेश महाले, धीरज सांगळे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या