Friday, May 10, 2024
Homeदेश विदेशना लवाजमा, ना बडेजाव! रतन टाटांच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लोकांची मने, पाहा...

ना लवाजमा, ना बडेजाव! रतन टाटांच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लोकांची मने, पाहा VIDEO

मुंबई । Mumbai

भारतीय उद्योग जगताचा विषय जेव्हा-जेव्हा निघतो, तेव्हा-तेव्हा काही नावं ओघाओघानं समोर येतात. जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या अशाच उद्योजकांमध्ये अग्रगणी आणि प्रचंड सन्मानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे, रतन टाटा (Ratan Tata).

- Advertisement -

रतन टाटा (Ratan Tata) नेहमीच आपल्या साधेपणामुळं चर्चेत असतात. त्यांच्या साध्या राहणीमानाचं कौतुक होतं. रतन टाटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आताही तीच खास बाब आहे ती म्हणजे त्यांची साधी राहणी. अलीकडेच मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ‘नॅनो’ कारमधून एन्ट्री घेतली. लगेचच समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि टाटांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

या व्हिडिओमध्ये रतन टाटा पांढऱ्या रंगाच्या टाटा नॅनोमध्ये बसताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत फक्त शंतनू नायडू दिसत आहे. तसेच ताज हॉटलचे कर्मचारी त्यांना निरोप देत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष असूनही त्यांच्यासोबत ना बॉडीगार्ड होते, ना कोणतीही विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या