Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedराष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून तुमच्या स्वागतासाठी सज्ज

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून तुमच्या स्वागतासाठी सज्ज

शेकडो प्रकारचे गुलाब व ट्यूलिप फुलांसोबत विदेशातील फुलांचे सौंदर्याने नटलेले मुघल गार्डन आजपासून सामान्य जनतेसाठी खुले होत आहे. १३ फेब्रवारी ते २१ मार्चपर्यंत हे उद्यान सामान्यांसाठी सुरु राहणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.

राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीला लागूनच असलेल्या भव्य आयताकार जागेत हे मुघल गार्डन पसरलेले आहे. विविध थीम्सवर आधारित या गार्डनमध्ये रोझ गार्डन, सर्क्युलर गार्डन, स्पिर्च्युअल गार्डन, हर्बल गार्डन, म्युझिकल गार्डन, बोन्साय गार्डन असे १२ विभाग आहेत.

- Advertisement -

ट्युलिप, मोगरा, रजनीगंधा, चाफा, रातराणी, जुई, चंपा, चमेली सारखी फुले मुगल गार्डनचे वातावरण सुगंधित करतात. फुलांचा हा उत्सव पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. उद्यानात जिथे नजर फिरवावी तिथे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांची उधळणच केलेली पाहायला मिळते.

निळा, लाल, गुलाबी, काळा, पिवळा, पांढरा, हिरवा…अशा विविध रंगांमध्येच नव्हे तर त्यांच्या रंगछटांमध्येही ही गुलाब मुगल गार्डनमध्ये आपणास दिसतात.

जितक्या रंगांमध्ये विविधता तितक्याच त्यांच्या सुगंधांमध्येही! काही गुलाबांची तर नावंही अगदी खास आहेत, जसे क्वीन एलिजाबेथ गुलाब, मदर टेरेसा गुलाब, अँजेलिक गुलाब… जगातील सर्वोत्तम रोझ गार्डन्सपैकी हे एक आहे.

स्पिर्च्युअल गार्डन

‘स्पिर्च्युअल’ हा अध्यात्म किंवा धार्मिकतेशी जोडलेला शब्द आहे. या उद्यानात चंदन, रुद्राक्ष, रिठा, शिकाकाई, ख्रिसमस ट्री, कल्पवृक्ष, खजूर, मनुका यांसारखी दुर्मिळ झाडे आहेत.

हर्बल गार्डन

अश्वगंधा, ब्राम्ही, लेमन-ग्रास, पाच प्रकारची मिंट, खस, ईसबगोल, सुगंधी तेल देणारे जिरेनियम, स्टिव्हिया यांसारखी औषधी झाडं या गार्डनमध्ये पाहायला मिळतात.

म्युझिकल गार्डन

हर्बल गार्डन पाहून डाव्या बाजूला वळलं की दिसतं ते म्युझिकल फाऊंटन गार्डन. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या या कारंज्या पाहिल्या की मनही ताजतवानं होऊन जातं. कारंज्यामुळे हे गार्डन थंडगार झालेलं असतं. दिल्लीच्या थंडीत हा गारवा अधिकच जाणवतो.

बोन्साय गार्डन

इथे पाहायला मिळतील ५० प्रकारची बोन्साय केलेली झाडं! संत्री, गुगुळ, कडूनिंब, लिंबू, चिंच, रतनज्योत वगैरे वगैरे… देशातील सर्वोत्तम बोन्साय झाडं इथे ठेवण्यात आली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या