Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारविनाकारण फिरणार्‍यांची धडगावात रॅपिड अँटिजन टेस्ट

विनाकारण फिरणार्‍यांची धडगावात रॅपिड अँटिजन टेस्ट

धडगाव – Dhadgaon – श.प्र :

धडगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्यात आली. करोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने आठवड्यातून शनिवार व रविवार ह्या दिवशी कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

तरीही विनाकारण फिरणार्‍यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. विनाकारण फिरणार्‍यांना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून समज देण्यात आहे. परंतु करोना महामारीचा खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून संचारबंदी काळात विनाकारण फिरणार्‍यांची रॅपिड अँटीजन चाचणी धडगाव येथील स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

अक्राणी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या आढळून येण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तरी कोरोना रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी विनाकारण बाहेर फिरणार्‍याची रॅपिड चाचणी करण्यात येत आहे व रॅपिड चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्या रुग्णाला योग्य तो उपचार देण्यात येणार आहे अशी माहिती अक्राणी तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली आहे.

यावेळी अक्राणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश वळवी, धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, आरोग्य सेवक संजय पावरा, गुलाब परमार, रमेश ब्राम्हणे, मिठाराम परमार, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या