Friday, April 26, 2024
Homeजळगावरणजितसिंग राजपूत यांचा मेवाडच्या राजकुमाराकडून गौरव

रणजितसिंग राजपूत यांचा मेवाडच्या राजकुमाराकडून गौरव

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

महाराणा प्रताप यांचे 34 वे वंशज (34th Descendant of Maharana Pratap) व मेवाडचे राजकुमार महाराजा लक्ष्यराज सिंह मेवाड (Prince of Mewar Maharaja Lakshyaraj Singh Mewar) यांनी येथिल रणजीतसिंग राजपूत (Ranjit Singh Rajput) यांना मेवाडची राजधानी असलेल्या उदयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सिटी पॅलेस येथे विशेष शाही आमंत्रण (Royal invitation) मिळाले व तसेच त्यांचा सन्मान (Honor) सुद्धा केला.

- Advertisement -

भारत सरकारच्या वतीने युवक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ कार्य करणार्‍या युवकाला दिला जाणारा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळाल्या नंतर समस्त राजपूत समाजाचा सन्मान वाढविल्याबद्दल मेवाडचे राजकुमार ह्यांनी त्यांना स्वतःहून आमंत्रन देऊन सन्मानित केले. राजपूत ह्यांना दिल्ली येथे राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान करण्यात देशातील युवा श्रेत्रात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानल्या जाणार्‍या ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ केंद्र सरकारद्वारे नुकतेच सन्मानित करण्यात आले. केंद्र स्तरावर दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार हा युवक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणार्‍या युवकाला दर वर्षी दिला जातो यंदा पुरस्काराचा बहुमान हा खानदेशात प्रथमच मिळाला असून ह्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

त्याच दरम्यान महाराणा प्रताप ह्यांचे वंशज असलेल्या मेवाडचे महाराजा लक्ष्यराज सिंह मेवाड ह्यांनी त्यांच्या राजमहलात रणजितसिंग राजपूत ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना सन्मानित केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की राजपूत समाजात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराणा प्रताप ह्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजासाठी कार्य करणार्‍या प्रत्येक युवक त्यांना आदर्श वाटतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या