Monday, April 29, 2024
Homeनगररांजणगाव खुर्दला शेतीशाळा उत्साहात

रांजणगाव खुर्दला शेतीशाळा उत्साहात

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

राहता तालुक्यातील रांजणगावखु येथील तालुका कृषी अधिकारी राहाता व कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव खुर्द येथे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेस तालुका कृषी अधिकारी राहाता बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्र येथील शास्रज्ञ डॉ. शैलेश देशमुख व डॉ. भरत दवंगे उपस्थित होते.

- Advertisement -

प्रथमतः तालुका कृषी अधिकारी राहाता बापूसाहेब शिंदे यांनी कृषी विभागाच्या योजना व खरीप हंगामात राबविण्यात येणार्‍या मोहिमेसंदर्भात शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. शैलेश देशमुख यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, उगवणक्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बी. एफ तंत्रज्ञानाने पेरणी , आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व काढणी बाबत सखोल मार्गदर्शन केले.भरत दवंगे यांनी सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रीयेची प्रात्यक्षिके घेण्यात आली. कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला..

या कार्यक्रमास रांजणगावच्या सरपंच सुनीताताई कासार, अ‍ॅग्रोवन फार्मर्स ग्रुपचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे, सचिव राजेंद्र गाढवे, कृषी पर्यवेक्षक संजय बोंबे, कृषी सहाय्यक राजेश पर्‍हे, किरण धुमाळ, आत्माचे किशोर कडू, राजदत्त गोरे, सिजंटाचे पवन थोरात, राहुल वारुळे, प्रगतशील शेतकरी डॉ. किशोर गाढवे, पांडुरंग गाढवे , चांगदेवदादा गाढवे, दादासाहेब गाढवे, परशराम गाढवे, पतिंगराव गाढवे, नितीन बोर्डे, वसंतराव चोळके, ज्ञानेश्वर कासार, भानुदास जंजाळ, शिवाजी भवर, सचिन घनघाव, सुरेश वाघ, शिवाजी गाढवे, दीपक गाढवे, किरण गोर्डे, संजय गाढवे, राहुल गाढवे, बाबासाहेब गाढवे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब गाढवे यांनी तर आभार कृषी सहाय्यक राजेश पर्‍हे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या