Thursday, April 25, 2024
Homeनगररांजणगावदेवी येथे तिरट जुगार खेळणार्‍या 6 जणांवर कारवाई

रांजणगावदेवी येथे तिरट जुगार खेळणार्‍या 6 जणांवर कारवाई

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून नेवासा पोलिसांनी तिरट जुगार खेळणार्‍या 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.

- Advertisement -

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रय बुचकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठकाजी म्हाळू पंडित (वय 41), सुनील जयवंत पाठक (वय 50), शंकर जगन्नाथ गोरडे (वय 66), दगडु हरिभाऊ कापसे (वय 58), पांडुरंग रामभाऊ चौधरी (वय 65) व मधुकर उत्तम गोरडे (वय 65) सर्व रा. रांजणगाव देवी ता नेवासा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले की, वरील सर्व आरोपी रांजणगावदेवी गावात कणगरे वस्ती येथे चिंचेच्या झाडाखाली विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले.

ठकाजी पंडित याचेकडे रोख रक्कम व अंदाजे 30 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल (एम एच 17 बी पी 2180) मिळून आली.

सुनील जयवंत पाठक याचेकडे 24 हजार 41 रुपये त्यात 2410 रुपये रोख व बजाज प्लॅटिना मोटारसायकल (एम एच 12 डीझेड 8720) मिळून आली.

शंकर जगन्नाथ गोरडे याचेकडे 19500 रुपये त्यात 500 /- रुपये रोख बजाज डिस्कव्हर मोटारसायकल व टेक्नो कंपनीचा मोबाईल मिळून आला. दगडू हरिभाऊ कापसे याचेकडे 470 रुपये रोख रक्कम व पत्ते मिळाले. पांडुरंग रामभाऊ चौधरी याचेकडे 1930 रुपये त्यामध्ये रोख रक्कम 1230 तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन मिळाला.

मधुकर उत्तम गोरडे याचेकडे 20 हजार 20 रुपये त्यात 20 रुपये रोख रक्कम तसेच पत्ते व सीटी 100 मोटार सायकल (एमएच 02 बीसी 571) असा सहा जणांकडे जवळपास एक लाख रुपये किमतीचा (99 हजार 430 रुपये) मुद्देमाल मिळून आला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा 12(अ) नुसार कारवाई केली असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. गडाख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या