जळगावात रंगभूमीची उपेक्षाच… अंधार्‍या स्टेजवर झाले नटराज पूजन

jalgaon-digital
5 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रंगभूमी दिनी शहरातील सर्वात मोठ्या नाट्यगृहाची (theater) दुरावस्था (poor condition) असून त्याची वीज कापण्यात (Power cut) आली आहे. रंगकर्मींनी (Rangkarmi) अंधारात नटराज पुजन (Nataraja Pujan in the dark) केले.

याप्रसंगी खेद व्यक्त करत शासनाने छ. संभाजी राजे नाट्यगृहाची ही दुरावस्था थांबवावी लवकरात लवकर वीज जोडावी अन्यथा नाट्यकर्मींतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी दिला आहे.

छ. संभाजी राजे नाट्यगृहात (In Sambhaji Raje Natyagriha) अस्वच्छ व अंधा-या रंगमंचावर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुजन करण्यात आले. यासोबतच भैय्यासाहेब गंधे सभागृहात चिंतामण पाटील यांच्या हस्ते नटराज पुजन करण्यात आले. बालगंधर्व नाट्यगृहातही नटराज पुजन करण्यात आले. या नाट्यगृहाच्या दुरावस्थेने कलावंतांना दुःख झाले. महानगरपालिकेचं दुर्लक्ष असून त्यांनी लक्ष द्यावे असे मत रंगभूमी दिनी अनेकांनी व्यक्त केले.

शहरातील सर्वात मोठे बंदिस्त नाट्यगृह छ. संभाजी राजे नाट्यगृह, भैय्यासाहेब गंधे सभागृहात, बालगंधर्व नाट्यगृहात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुजन करण्यात आले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने शहरातील गंधे सभागृह, छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह तसेच बालगंधर्व सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी नाट्यपरिषदेचे पदाधिकारी अ‍ॅड संजय राणे, जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, चिंतामण पाटील, पुरुषोत्तम चौधरी, सुहास वेल्हणकर, होरिलसिंग राजपूत, विनोद ढगे, पियुष रावळ, राजेंद्र देशमुख, मंगेश कुलकर्णी, भास्कर जमागडे, अरुण सानप , योगेश शुक्ल, हर्षल पाटील, गणेश सोनार, मोहन तायडे, ओमप्रकाश शर्मा, धनराज सानप, अमोल ठाकूर, नेहा पवार, राहुल पवार, अमोल राजपूत, रवी साळी, सरिता खाचणे, प्रविण पांडे, हनुमान सुरवसे हेमंत माळी, सुनील परदेशी, श्रीकांत चौधरी, संजय कासार, रोहन काटे, आकाश बाविस्कर, सचिन महाजन, संजय निकुंभ आदी नाट्यकर्मी उपस्थित होते. याप्रसंगी नांदी व गण कलावंतांनी सादर केले.

परिवर्तनतर्फे भाऊंच्या उद्यानात नटराज पूजन

रंगभूमी दिना निमित्त जळगाव शहरातील विविध ठिकाणी असलेल्या नाट्यगृहातील रंगमंचाचे व नटराज पुजन करण्यात आले. परिवर्तन जळगाव तर्फे भाऊंच्या उद्यानातील अ‍ॅम्पी थिएटरवरील रंगमंचाचे पुजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौरांनी जळगावातील नाट्यचळवळी विषयी व कार्याविषयी विजय पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.

हर्षदा कोल्हटकर व प्रतिक्षा कल्पराज यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे गायन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. याप्रसंगी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील भारतेंदु नाट्य अकादमी संस्थेत नाट्य शिक्षणासाठी जळगावच्या ईश्वर नाना पाटील या नाट्य कलावंताची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी परिवर्तनच्यावतीने महापौर व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिरिष बर्वे, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर, राजेंद्र देशमुख, चंदु नेवे, अंजली पाटील, सोनाली पाटील, सोनाली पाटील, होरिलसिंग राजपूत, मनिषा बाविस्कर, मोहन तायडे, मंगेश कुलकर्णी, भाऊसाहेब पाटील, हर्षदा कोल्हटकर, निलिमी जैन, मोना निंबाळकर, नेहा पवार, हनुमान सुरवसे, सागर भंडगर, प्रेमकुमार बडगुजर, स्वप्नील वाघ, राहुल सोनवणे, सुनील परदेशी, हेमंत माळी आदी उपस्थित होते.

समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे नटराज पूजन

शहरातील पिंप्राळा रोड वरील बेंडाळे नगरात मराठी रंगभूमी दिनानिमित्त समर्थ कला बहुद्देशीय संस्थेच्या कलावंतांतर्फे नटराज पूजन करण्यात आले. या प्रसंगी मुक्ती, उंच माझा झोका गं, सांबरी या नाटकातील प्रवेशांचे अभिवाचन करण्यात आले. तर पूर्वा जाधव हिने एकपात्री नाटक सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. मुलींनी लमाणी नृत्य सादर केले. संस्थेचे कलावंत स्वप्निल खडके यांच्या हस्ते नटराजाला माल्यार्पण करण्यात आले तर प्रतीक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून नव्या नाटकाचा शुभारंभ करण्याची घोषणा करण्यात आली.

नटराज पूजनाच्या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक आर.बी.जाधव व शोभा जाधव उपस्थित होते. याप्रसंगी गणेश सोनार सागर चौधरी, विशाल जाधव ,भावेश पाटील, मयूर भंगाळे, रवी परदेशी, महेश कोळी, कृष्णा बारी, तेजस कोठावदे अंकुश काकडे, विजय कोळी, मयूर भंगाळे, कृष्णा पाटील ,आकाश भारंबे श्रीकांत ढाबे, शुभम सपकाळे, समर्थ जाधव ,रोहिणी निकुम ,अश्विनी कोल्हे, मृणाल पाटील, लीना पाटील, मोक्षदा लोखंडे हे कलावंतही उपस्थित होते.

नाट्यगृहाची ही दुरावस्था थांबवावी..अन्यथा आंदोलन

रंगभूमी दिनी शहरातील सर्वात मोठ्या नाट्यगृहाची दुरावस्था असून त्याची वीज कापण्यात आली आहे. रंगकर्मींनी अंधारात नटराज पुजन केले. याप्रसंगी खेद व्यक्त करत शासनाने छ. संभाजी राजे नाट्यगृहाची ही दुरावस्था थांबवावी लवकरात लवकर वीज जोडावी अन्यथा नाट्यकर्मींतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी दिला आहे.

छ. संभाजी राजे नाट्यगृहात अस्वच्छ व अंधा-या रंगमंचावर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुजन करण्यात आले. यासोबतच भैय्यासाहेब गंधे सभागृहात चिंतामण पाटील यांच्या हस्ते नटराज पुजन करण्यात आले. बालगंधर्व नाट्यगृहातही नटराज पुजन करण्यात आले. या नाट्यगृहाच्या दुरावस्थेने कलावंतांना दुःख झाले. महानगरपालिकेचं दुर्लक्ष असून त्यांनी लक्ष द्यावे असे मत रंगभूमी दिनी अनेकांनी व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *