Friday, April 26, 2024
Homeजळगावरानभाजी महोत्सव

रानभाजी महोत्सव

जळगाव – Jalgaon

जळगाव शहरात कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवास भेट देऊया. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. श्रीमती रंजनाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

या कार्यक्रमास रावेर मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती श्रीमती उज्वलाताई माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या/फळे यांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. सद्य:परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल.

यामध्ये करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, घोळ, अंबाडी, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा आदिंसह इतर विविध 20 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे. तरी जळगाव शहरातील नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घेऊन अवश्य भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांनी संयुक्तपणे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या